महाराष्ट्रविशेषशहर
Trending

लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्या प्रकरणी बारामती येथील डॉक्टरवर गुन्हा दाखल…

लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्या प्रकरणी बारामती येथील डॉक्टरवर गुन्हा दाखल…

नमस्कार बारामती शहरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे .शहरातील देवकाते हॉस्पिटल येथील डॉक्टर रा. बारामती यांच्यावर 34 वर्षे महिला परिचारिकेने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहितीनुसार देवकाते हॉस्पिटल येथे कार्यरत असणाऱ्या एका 34 वर्षवर्षीय महिला परिचारिकेवर सदर डॉक्टरने दिनांक 20 जुलै 2023 ते 3 मार्च 2024 या कालावधीत दूध संघ सोसायटी व जंक्शन येथे नेऊन अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे .सदर परिचारिकेस तुझ्याबरोबर लग्न करतो असे सांगितले .व त्याच्या राहत्या घरात अडकून ठेवून तू जर याबद्दल कोणास काही सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन फिर्यादीवर अत्याचार करून तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध करून दमदाटी केली आहे. सदर प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी डॉक्टर यांच्यावर भादवि कलम 376 क (ड) 376 (2) एन 498 ,323,506 नुसार गुन्हा रजिस्टर केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button