वाल्हे (ता.पुरंदर) येथे चोरट्यांचा कहर. रोख रक्कम तसेच दुचाकी चोरीला….
वाल्हे तालुका पुरंदर येथे दिनांक 3 मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान चोरट्यानी रोख रक्कम व दागिन्यासह दुचाकी चोरून नेल्याची तक्रार जेजुरी पोलीस स्टेशन येथे दाखल झाली आहे. जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणाबाबत मंगेश रमेश पवार वय तीस वर्षे राहणार वाल्हा यांनी फिर्यादी दिली असून त्यांच्या घरी सुमारे 65 हजार रुपयांच्या दागिने तसेच चांदीच्या वस्तू, वीस हजार रुपये रोख रक्कम तसेच फिर्यादीचे मित्र सुनील दत्तात्रय भोसले राहणार यांची पंधरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जेजुरी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान कलम 379 380 457 नुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरीच्या घटनेने वाल्हे येथे खळबळ उडाली असून सदर प्रकरणाचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काशीद करत आहेत.