प्रसिद्ध सनई वादक आकाश मोरे याचा श्री मार्तंड देव संस्थान यांच्याकडून सन्मान
दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतभर श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा जल्लोष सुरू होता. अयोध्येतील भव्य असे राम मंदिर साकारले गेले असून या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यात प्रसंगी श्री खंडोबा देवाचे मानकरी महेंद्र मोरे यांचा मुलगा कु.आकाश महेंद्र मोरे याला प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त दि.22 जानेवारी ला आयोध्या येथे सनई वादन करण्याची अमूल्य अशी संधी मिळाली.
भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी त्यांच्या वादनाचे कौतुक देखील केले. जेजुरीमधून श्री मार्तंड देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त पोपट सदाशिव खोमणे यांना देवसंस्थांचे प्रतिनिधी म्हणून तर सनई वादक म्हणून आकाश मोरे याला या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती.
आज श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळाकडून कु.आकाश महेंद्र मोरे याचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे,मंगेश घोणे, एडवोकेट पांडुरंग थोरवे, विश्वास पानसे, राजेंद्र जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.