धक्कादायक! बारामती येथील गंगासागर लॉज मध्ये महिलेचा खून..
नमस्कार बारामती शहरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे काल दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:55 वाजता बारामती शहरातील सिनेमा रोड येथील हॉटेल गंगासागर लॉज येथे एका महिलेचा खून झालेला आहे अशी बातमी पोलिसांना मिळताच पोलीस सदर ठिकाणी पोहोचले व पोलिसांनी तपासणी चक्र सुरू केले.
सदर गुण्यातील मयत महिलेचे नाव रेखा विनोद भोसले वय 36 राहणार सोनवडी तालुका दौंड जिल्हा पुणे असल्याचे निष्पन्न झाले असून तिचा खून तिचा पती विनोद गणेश भोसले राहणार बी विंग रूम नंबर दोन माळसाई कृपा आप्पा शास्त्रीनगर कोपर रस्ता डोंबिवली यांनी केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे .आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याची पोलिसांच्या तपासात प्रथमदर्शनी निष्पन्न झाले असून त्याबाबत मयत महिलेचे वडील महादेव धोंडीबा सोनवणे वय 58 राहणार सोनवडी तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी विनोद गणेश भोसले राहणार बीबी यांच्याविरुद्ध फिर्यादी दिल्याने रात्री उशिरा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खुनाचा भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पोलीस सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
आरोपीचा शोध चालू असून तपास कामी वेगवेगळी तपास पथके रवाना करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेके व इतर अधिकारी अमलदार हे तपास करत आहेत