जानाई देवीच्या पालखीचे मोठ्या उत्साहात निवकणेकडे प्रस्थान.. भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती.

जेजुरीचे ग्रामदैवत असलेल्या जानाई देवीच्या पालखीचे निवकणेकडे प्रस्थान.. भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती.
जेजुरीचे ग्रामदैवत असलेल्या जानाई देवीचा पारंपारिक पालखी पदयात्रा सोहळा बुधवारी सायंकाळी सातारा जिल्ह्यातील निवकणे कडे जाण्यासाठी प्रस्थान झाला. यंदाच्या वर्षी या पालखी सोहळ्यासाठी जेजुरी व पंचक्रोशी मधील नागरिका मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे. जानाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील निवकणे येथील दर्या खोऱ्यात असून जानाई भक्त नागू माळी यांच्या भक्ती मुळे ही देवता जेजुरीत आली. तेव्हापासून जेजुरी ते निवकणे असा पायी पालखी सोहळा अनेक पिढ्यांपासून काढण्यात येतो. शनिवारी महाशिवरात्रीला जाणाई देवीचा पालखी सोहळा जेजुरी गडावर जाऊन श्री खंडोबा व शिवलिंगाची देव भेट घेण्यात आली. त्यानंतर जेजुरीतील जानाई देवीच्या मुख्य मंदिरात पूजा होऊन पालखी सोहळा तीन दिवस जेजुरी येथील मेंडके वाड्यात मुक्कामी होता. आज बुधवारी दिनांक 22 रोजी पूजा अभिषेक होऊन दुपारी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली .परंपरेप्रमाणे शिवखिंडीत परडी पूजन व समाज आरती होऊन हा सोहळा निवकणेकडे मार्गस्थ झाला. यावेळी जानाई देवी पालखी पदयात्रा अन्नदान सेवा ट्रस्टच्या वतीने नगराध्यक्षा विना सोनावणे ,विरोधी पक्ष नेते जयदीप बारभाई, जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांचा सन्मान करण्यात आला.
दिनांक 27 फेब्रुवारी सातारा जिल्ह्यातील कावदरा येथे निसर्गपूजन करून हा सोहळा निवकणे येथे पोहोचणार आहे .व मंगळवारी 28 रोजी श्री क्षेत्र धारेश्वर येथे देवीचे स्नान परडी, पूजन होऊन निवकणे येथे चौक भरून यात्रेला सुरुवात होणार आहे .यावेळी महाप्रसाद रात्री देवीचा छबिना व जागर होणार आहे व बुधवारी एक मार्च रोजी चौक फुटून यात्रेची सांगता होणार आहे व पालखी सोहळा परतीच्या वाटेला सुरुवात करणार आहे. अशी माहिती जानाई भक्त नागू माळी ट्रस्टचे प्रमुख नागनाथ झगडे यांनी दिली.


