महाराष्ट्रविशेषशहर
Trending

कै. दिनकरराव सावंत स्मृती प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा संपन्न

कै. दिनकरराव सावंत स्मृती प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा संपन्न

दरवर्षीप्रमाणे यंदाही कै. दिनकरराव सावंत स्मृती प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिल्या जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पुरस्काराचे यंदाचे हे 24 वे वर्षे असून यावर्षी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार उघडा मारुती मित्र मंडळ जेजुरी यांना उल्लेखनीय कार्याबद्दल जाहीर झाला असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने समाजात समाजोपयोगी अनेक उपक्रम पार पाडले आहेत.

तसेच यंदाचे जनसेवक पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रमोद वाघ, सामाजिक कार्यकर्ते मोहनलाल निगडे तसेच दैनिक संध्या व संध्या लाईव्ह संपादिका ज्योती नाळे, वंदे मातरम संघटनेचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष अनिकेत रामचंद्र हरपळे यांना जाहीर झाला. हे सर्व पुरस्कार पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

जेजुरी येथील कडेपठार रोडवर असलेल्या कडेपठार रिसॉर्ट येथे दिनांक 12 जानेवारी दुपारी दोन वाजता हा पुरस्कार सोहळा पार पडला . या कार्यक्रमाप्रसंगी जिजामाता जुनियर कॉलेजचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर सर,,कै. दिनकरराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत, तसेच उद्योजक रवींद्र जोशी, रोटरी क्लब पुरंदरचे अध्यक्ष डॉक्टर सुमित काकडे, नितीन राऊत, प्रल्हाद गिरमे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button