Uncategorized

“मुस्लिम भाविकांसाठी अजमेरला जाणाऱ्या रेल्वेला, जेजुरीत थांबा मिळावा” म्हणून पाठपुरावा करणार…. सचिन पेशवे यांची माहिती.

मुस्लिम भाविकांसाठी अजमेरला जाणाऱ्या रेल्वेला जेजुरीत थांबा मिळावा म्हणून पाठपुरावा करणार…. सचिन पेशवे यांची माहिती

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अजमेरच्या ख्वाजा शरीफ दर्ग्याला दरवर्षी लाखो लोक भेट देत असतात. पुरंदर तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधव त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात .मात्र या भाविकांना रेल्वेने जायचे असल्यास एक तर सातारा किंवा पुणे या ठिकाणी सदर ट्रेनसाठी जावे लागते .मात्र त्यांना जेजुरीतच त्या रेल्वेसाठी थांबा मिळावा म्हणून त्यांची आग्रहाची मागणी होती. आज जेजुरी येथे सार्वजनिक विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाचा वार्तालाप कार्यक्रम भारतीय पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आला होता .यावेळी सचिन पेशवे यांनी असे सांगितले की आदरणीय खासदार गिरीश बापट हे रेल्वे समितीवर सदस्य म्हणून आहेत. लवकरच त्यांची भेट देऊन या संदर्भात निवेदन सादर करणार आहोत. व केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचा पाठपुरावा करून अजमेरला जाणाऱ्या रेल्वेसाठी व इतर अजून पाच प्रमुख लांब पल्ल्याच्या रेल्वेसाठी जेजुरीत थांबा मिळावा यासाठी पत्र देणार आहे. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जेजुरी अध्यक्ष सचिन पेशवे , पुरंदर सरचिटणीस सातपुते,तसेच जेजुरी शहर कार्याध्यक्ष गणेश भोसले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button