Uncategorized

भर चौकात वाढदिवसाचा केक कापणे पडले महागात बारामती मधील घटना

भर चौकात केक कापणे पडले महागात.. बारामती मधील घटना

नमस्कार सध्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराकडून सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार घडत असतात. मात्र भर चौकात वाढदिवसाचा केक कापणे काही तरुणांना चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. सदर घटना बारामतीतील असून हा प्रकार कसबा येथील सातव चौकात घडला आहे. रेकॉर्ड वरील गुन्हेगार समीर दादासाहेब चांदगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या समर्थकांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त शहरातील सातव चौकात केक कापण्याच्या कार्यक्रम ठेवला होता. त्यानिमित्ताने चौकात अनेक मुले गोळा झाल्याने परिसरात दशतीचे वातावरण पसरले. अशा प्रकाराची माहिती बारामती पोलिसांना मिळताच पोलीस तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. व त्या ठिकाणी झडप घालून चार तरुणांना ताब्यात घेतले मात्र याचा फायदा घेत अन्य तरुण मात्र पसार झाले. व ज्याचा वाढदिवस होता तोही पसार झाला. पोलिसांनी १)राहुल राजेंद्र मदने.२) विकास नानासो चंदनशिवे.३) अक्षय भीमराव कांबळे.४) सागर रमेश आटोळे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १४३,१४७,१४९,५०४,५०६ व क्रिमिनल अमेंडमेंट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. बारामती शहर पोलिसांनी असे आवाहन केले आहे की यापुढे कॉलेज शिकणाऱ्या तरुणांनी याची विशेष काळजी घ्यावी. अशा प्रकारास भाग घेतल्यास त्यांना जर गुन्हेगारीचे प्रमाणपत्र मिळाले तर त्यांच्या गुणवत्तेची व इतर प्रमाणपत्रांची किंमत शून्य होते. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button