
नमस्कार ,महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने सध्या समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती .त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच पेटले होते. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनात मनोहर भिडे यांना अटक करण्याची मागणी केली होती.

ते प्रकरण कुठे शांत होते ना तोच अमरावती येथे आपल्या तीन तासाच्या भाषणात संभाजी भिडे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबा वर शलाघ्य भाषेत टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे . महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संताप जनक विधाने करतानाच त्यांनी सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा यांना चक्क देवाऱ्यातून काढून टाका !अशी असे विधान केले आहे.

आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी की पुण्यात येत असून त्यांच्या कानावर हा विषय घालण्याची गरज असल्याची त्यांनी सांगितले.

तसेच संभाजी भिडे यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली पाहिजे. ते राज्यात व देशात वातावरण दूषित करण्याचे काम करत असून त्यावरच आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. असेही ते म्हणाले.


