
सासवड पोलिसांची कामगिरी.. .दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या …पाच मोटरसायकल जप्त…
नमस्कार ,सासवड पोलिसांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळे एका सराईत दुचाकी चोराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण पाच गुन्हे उघ कीस आणून पाच मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

सासवड पोलिसांकडून मिळाल्या माहितीनुसार सासवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस हवालदार संतोष शिंदे ,गणेश पोटे, योगेश गरुड, वाहतूक वार्डन ऋतुराज देसाई ,विक्रम जगताप असे सासवड शहरांमध्ये जेजुरीला नाका येथे वाहतूक नियमन करीत असताना दुपारी तीन च्या सुमारास एक इसम संशयास्पद स्थितीत मोटरसायकल घेऊन जाताना दिसून आला. त्यांनी त्याला थांबवले व त्याच्याकडे गाडीची कागदपत्र व वाहन चालवण्याचा परवाना मागितला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

व तो त्याच्या ताब्यातील होंडा शाईन गाडी सोडून नारायणपूर बाजूकडे पळून गेला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून ताब्यात घेतले. यावेळी आरोपीस विश्वासात घेऊन त्याच्या ताब्यात असलेली होंडा शाईन मोटरसायकल एम एच 42AB 0327 बाबत विचारणा केली असता त्यांनी सदरची मोटर सायकल बारामती रूई एमआयडीसी परिसरातून चोरली असल्याची कबुली दिली. तसेच तो चाकण येथून बारामती ते घरी महिन्यातून दोन महिन्यातून जात येत होता व गावी जाण्यासाठी गाडी पाहिजे होती. व घरचे गाडी घेऊन देत नव्हते ,म्हणून तो गाड्या चोरून काही दिवस वापरून सोडून देत असत. त्याने सासवड परिसरातून चार मोटरसायकली चोरल्या असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्ताफ इक्रार सय्यद वय वीस वर्ष राहणार रुई एमआयडीसी बारामती याला ताब्यात घेतले असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे.

त्याच्यावर सासवड पोलीस स्टेशन येथे एकूण चार दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असून बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल आहे. त्याने एकूण पाच मोटरसायकल चोरल्याची कबूली दिली असून त्याची किंमत सुमारे १ लाख ८५ हजार रुपये आहे.

. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन संतोष जाधव ,पोलीस अमलदार संतोष शिंदे, गणेश पोटे, योगेश गरुड जब्बार सय्यद विशाल नगरे शरद जाधवर, होमगार्ड विक्रम जगताप, ट्राफिक वार्डन श्रीकांत भंडलकर, चक्रधर गोपाळघरे ऋतुराज देसाई, सचिन पवार, अक्षय लोंढे यांच्या पथकाने केलेली आहे.


