Uncategorized

अजित पवार यांचा संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावरच दावा…. शरद पवार यांच्या गटाला धक्का…

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर गेले दोन दिवस महाराष्ट्राचे राजकारण हे संपूर्ण देशाच्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी रविवारी अचानक शिंदे सरकारमध्ये दाखल होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. व एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचीच पुनरावृत्ती झाली का काय? असा प्रश्न निर्माण झाला. अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीतील छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील या शरद पवारांशी एकनिष्ठ असणाऱ्या दिग्गजांनी सुद्धा मंत्री पदाची शपथ घेतली. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभीफूट पडल्याचे स्पष्ट झाले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गट व अजित पवार गटाने आज मुंबई बैठका आयोजित केल्या होत्या त्या निमित्ताने पक्षातील आमदार, खासदार व कार्यकर्ते कुणाबरोबर आहेत याचा शक्तिप्रदर्शन करून आपली ताकद आजमवण्याचा प्रयत्न होता.

त्याचाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर व पक्षावर आपला दावा केला आहे व अजित पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर करून तशा आशयाचे पत्रच निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. मात्र यापूर्वीच शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल करून आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय पक्ष व चिन्ह बाबत कोणताही निर्णय देऊ नये असा अर्ज अगोदरच निवडणूक आयोगाकडे दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शिवसेनेच्या बंडाच्या आठवणी जनसामान्यात पुन्हा जाग्या झाल्या आहेत. अगदी अशाच पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी बंड केल्या मुळे शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतीत वाद निर्माण झाला होता. त्यावेळी हे प्रकरण निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टात गेले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button