
#गौतमी पाटील…मुलगी झाली लावणी स्टार ..मात्र वडील आढळले दयनीय अवस्थेत….

नमस्कार ,आपल्या दिलखेचक नृत्यांनी महाराष्ट्रातील अवघ्या तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटील…. तिचे वडील अत्यंत दयनीय अवस्थेत रस्त्याच्या कडेला सापडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुळे येथील एका रस्त्यावर एक वृद्ध व्यक्ती बेवारस अवस्थेत पडल्याची माहिती मिळवल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णाला दाखल केले .व त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला मात्र हा वायरल व्हिडिओ झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक फोन येऊ लागले

.त्या फोन मधून सदर गंभीर व्यक्ती ही प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील असल्याचे निष्पन्न झाले. मात्र हा प्रकार कळताच त्यांचे नातेवाईक सुद्धा रुग्णालयात दाखल झाले. काही दिवसांपूर्वी पुण्यात सुद्धा असाच एक प्रकार उघडकीस आला होता वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारला येण्यासाठी त्याच्या मुलीने नकार दिला होता. तो प्रकार अजून चर्चेत असतानाच गौतमी पाटील यांच्या वडीला बाबत घडलेल्या प्रकरणामुळे समाजमन ढवळून निघाले आहे.



