महाराष्ट्रविशेषशहर
Trending

जालना येथील लाठीचार्ज निषेधार्थ जेजुरी सकल मराठा समाजातर्फे पोलीस स्टेशन यांना निवेदन…

जालना येथील लाठीचार्ज निषेधार्थ जेजुरी सकल मराठा समाजातर्फे पोलीस स्टेशन यांना निवेदन…

नमस्कार अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा आरक्षण व ईतर मागण्यासाठी आंदोलन सुरू होते.मात्र आंदोलन च्या दरम्यान त्याला हिंसक वळण प्राप्त होऊन पोलीस व आंदोलक यांच्यात जोरदार धुम्मचक्री उडाली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी दिनांक 29 ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यानंतर सुद्धा जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम राहिल्याने व त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचार करता हलवण्याकरता पोलीस फौज फाटा आंदोलन स्थळी जमा झाल्याने आंदोलक व त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे वृत्त असून यानंतर दगड फेक होऊन पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याने संपूर्ण राज्यभरातून त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया आहे.

जालना येथे झालेल्या या घटनेचा निषेध करण्याकरता राज्यभरातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया ऊमटत आहेत. संपूर्ण राज्यभरातून इयत्ता निषेध व्यक्त केला जात आहे.
जालना येथे आंदोलकावर झालेल्या लाठी चारचार्ज विरोधात आज सकल मराठा समाज जेजुरी यांच्या वतीने जेजुरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी सदर निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे यांनी स्वीकारले. याप्रसंगी संदीप आप्पा जगताप, सुधीर भाऊ गोडसे, ईश्वर दरेकर, उमेश जगताप, लोकेश सावंत अनिकेत हरपळे
, निलेश हरपळे व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button