जेजुरी गडावर शिखर काठ्यांची यात्रा शांततेत पार पाडावी..जेजुरी पोलिसांचे आवाहन!

जेजुरी गडावर शिखर काठ्यांची यात्रा शांततेत पार पाडावी . जेजुरी पोलिसांचे आवाहन
जेजुरी दि २४ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा गडावर रविवार दि २५ रोजी माघ पोर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या शिखर काठ्यांची देवभेट होत असून हा धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडून सहकार्य करावे असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी केले आहे.
जेजुरी गडावर माघ पोर्णिमा यात्रेनिमित्त रूढी परंपरे नुसार संगमनेर येथील होलम,सुपे येथील खैरे,जेजुरी येथील होळकर या मानाच्या शिखर काठ्यां बरोबरच अनेक गावाच्या शिखर काठ्यांची देवभेट होत आहे या अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये शिखर काठ्यांच्या मानकर्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत पूर्वी ठरलेल्या नियमानुसार सकाळी ९ ते १२ वाजे पर्यंत सुपे येथील खैरे मानकरी,व १ ते ३ या वेळेत संगमनेर होलम राजाच्या मानकर्यांनी मंदिरात शिखर काठी आणून देव भेट करावी, हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, या सोहळ्यात व्यसन करणाऱ्या व्यक्तींना जेजुरी गडावर सोडले जाणार नाही. व्यसन करून त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले.

जेजुरी गडावर शासनच्या वतीने पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मंदिर विकासाचे काम सुरु असून या कामात अडथळा येवू नये असे देवसंस्थानच्या वतीने आवाहन करण्यात आले.
शिखर काठी सोहळा गडावर जात असताना नंदी चौकातील अतिक्रमणे दूर करावीत,तसेच पायरी मार्गावर दुकानासाठी लावलेल्या दोरी ,कापड काढून टाकावे अशी मागणी यावेळी भागणी भाविकांनी केली.
या वेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे,जेजुरी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंद्डे,विश्वस्त अड पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे,व्यवस्थापक राजेंद्र जगताप,सतीश घाडगे,गणेश डीखळे,बाळासाहेब खोमणे, संगमेश्वर शिखरकाठीचे प्रमुख तुकाराम काठे,दिलीप गुंजाळ,कैलास शिंदे,संजय मेहेर,सतीश कानवडे,गणेश काठे,विलास गुंजाळ,सुपे येथील मानकरी शहाजी खैरे,शरद खैरे,देविदास भुजबळ,भगवान खैरे,सुरेश खैरे,रवींद्र अपसुंदे आदी उपस्थित होते.
फोटो पाठविला आहे.
जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये शिखर काठी यात्रेनिमित्त नियोजन बैठक संपन्न झाली.


