आकुर्डीत स्पोर्ट्स डे चे आयोजन: –
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयामध्ये दिनांक
२५/०२/२०२४ रोजी “स्पोर्ट्स डे” उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे संचालक डॉ.संतोष खलाटे यांच्या संकल्पनेतून स्पोर्ट्स डे चे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक गुणांबरोबरच मैदानी कलागुणांना वाव मिळावा म्हणून महाविद्यालयात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
विभागप्रमुख प्रा. तेजाली देसरडा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी क्रिकेट, खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, थ्रो बॉल, कॅरम अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सर्व खेळात उत्स्फूर्त सहभागी होत खेळाचा आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.अजित पतंगे, प्रा.पूजा प्रजापती, प्रा.प्रणव मुळे, प्रा.प्रियंका डोशी, प्रा.अंकिता व्हटकर, जुनियर क्लार्क सुमित जगदाळे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.