अयोध्या येथील श्री श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे मार्तंड देव संस्थान. जेजुरी यांना निमंत्रण..

नमस्कार येत्या २२ जानेवारी रोजी करोडो लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आयोध्या येथे होत आहे. प्रभू राम श्री चंद्राचे आयोजित भव्य राम मंदिर व्हावे अशी संपूर्ण भारतीयांची इच्छा होती व या इच्छेचे मूर्त स्वरूप प्राप्त होत असून येत्या 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे.

या सोहळ्यासाठी मोठी जय्यत तयारी सुरू असून भारतातील महत्त्वाच्या व्यक्ती तसेच प्रमुख देवस्थाने यांना सुद्धा या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून महाराष्ट्रातील लाखो लोकांचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा देवता ( मार्तंड देव संस्थान. जेजुरी) यांना सुद्धा या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून याचे निमंत्रण आज रविवार दिनांक १४ जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री संजयजी मुद्राळे तसेच पश्चिम महाराष्ट्र धर्म प्रसार प्रमुख राजाभाऊ चौधरी यांच्या हस्ते मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळास देण्यात आले. यावेळी मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त अभिजीत देवकाते, मंगेश घोणे विश्वास पानसे, डॉक्टर राजेंद्र खेडेकर, एडवोकेट पांडुरंग थोरवे अनिल सौंदाडे व कर्मचारी उपस्थित होते.



