जेजुरी येथे खंडोबाचे दर्शन घेऊन निर्माते मंगेश देसाई यांची “धर्मवीर २” ची घोषणा…..

जेजुरी येथे खंडोबाचे दर्शन घेऊन निर्माते मंगेश देसाई यांची “धर्मवीर २” ची घोषणा…..

नमस्कार ,चित्रपट निर्माता मंगेश देसाई यांनी सोमवारी दि.७ ऑगस्ट रोजी अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील श्री खंडेरायाचे दर्शन घेऊन धर्मवीर 2 या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. आज मंगेश देसाई यांच्याबरोबरच प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक प्रवीण तरडे हे देखील उपस्थित होते .धर्मवीर या चित्रपटाचा पहिला भाग प्रचंड लोकप्रिय झाला होता. अभिनेता प्रसाद ओक यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांची भूमिका अत्यंत उत्तम प्रकारे साकारली होती. स्वर्गीय आनंद दिघे यांचा संपूर्ण जीवनपट या चित्रपटातून उलगडून दाखवण्यात आला होता. त्याच बरोबर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही राजकीय जीवनावर यात प्रकाश टाकण्यात आला होता.

मात्र आत्ता धर्मवीर दोन ची घोषणा करत असताना आजची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलून केली आहे प्रखर हिंदुत्वच्या मुद्द्यावर शिवसेना फुटली असून एकनाथ शिंदे यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा नारा दिला आहे. आज या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध झाले असून त्यावर “साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” अशी कँच लाईन देण्यात आली असून निर्माता मंगेश देसाई यांनी खालील प्रकारे पोस्ट केली आहे.
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब यामाध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि ‘असा माणूस होणे नाही’ हेही सर्वांना समजलं. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, म्हणूनच ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे – भाग 2 ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करतोय, लवकरच…बघुया धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2…
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, लवकरच… 🔥



