“आनंदाचा शिधा आता गौरी गणपती व दिवाळीसाठी सुद्धा” पहा शिंदे सरकारचे आजचे मंत्रिमंडळ निर्णय…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यात प्रामुख्याने महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आनंदाचा शिधा या योजनेचा समावेश असून आता हा शिधा गौरी गणपती व दिवाळीत सुद्धा शंभर रुपयात मिळणार आहे.

👉 संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे –
✅राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव
✅गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात #आनंदाचाशिधा . प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा सामान्य नागरिकांना मिळणार आहे. हा शिधा गौरी गणपती निमित्त १९ सप्टेंबर रोजी तसेच दिवाळी या सणासाठी १२ नोव्हेंबर पासून वितरित करण्यात येणार.
✅आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार

✅मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी
✅महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द
✅केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला.

✅सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे
✅दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन
✅मंडणगड येथे दिवाणी न्यायालय
#CabinetDecisions


