महाराष्ट्र
Trending

अवैध व्यवसाय विरोधात जेजुरी पोलिसांची धडक कारवाई….

अवैध व्यवसाय विरोधात जेजुरी पोलिसांची धडक कारवाई….

नमस्कार जेजुरी पोलीस स्टेशन येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी अवैध व्यवसायांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे .अवैध व्यवसाय विरोधात जेजुरी पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उभारला आहे. दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त शासनाकडून जाहीर केल्याप्रमाणे ड्रायडे निमित्त सर्व अधिकृत मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

मात्र या संधीचा लाभ उठवण्यासाठी अवैध मद्य विक्री करणारे सरसावले होते .तालुक्यात बरेच ठिकाणी अवैधपणे मद्यविक्री होत असल्याची माहिती जेजुरी पोलिसांना कळल्यानंतर जेजुरी पोलिसांनी याच्याविरोधात कारवाई करत सुमारे पाच ठिकाणी अवैध मद्यविक्री करणाऱ्या ठिकाणी छापा घातला असून एका ठिकाणी अवैधपणे जुगार मटका घेणाऱ्या वर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.

जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यात दिनांक 15 ऑगस्ट रोजी एकूण पाच ठिकाणी अवैध मद्य विक्रीच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून ती पिसर्वे येथे दोन ठिकाणी, तर पांडेश्वर नाझरे रोडच्या कडेला एका ठिकाणी, मौजे गुळूंचे गावचे हद्दीत गूळूंचे मोरगाव रोडला, तसेच मौजे टेकवडी गावच्या हद्दीत टेकवडी माळशिरस रोड लगत व धालेवाडी रोड येथे जुन्या पालखीतळाच्या शेजारी अवैधपणे मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना आढळून आली. या विविध ठिकाणी कारवाई केली असता दोन महिला व चार इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर या सर्वांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 65 e d नुसार कारवाई करण्यात आली आहे. हि धडक कारवाई जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button