महाराष्ट्र

दुसऱ्या दिवशीही खाजगी केबलचे खोदकाम जेजुरी ग्रामस्थांनी बंद पाडले….!

दुसऱ्या दिवशीही खाजगी केबलचे खोदकाम जेजुरी ग्रामस्थांनी बंद पाडले..

नमस्कार एका खाजगी केबल साठी जेजुरी शहरातून खोदकाम चालू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. सदर वाहिनीसाठी जेजुरी येथील कडेपठार कमानीच्या रोड पासून ते जानुबाईआळी आचार्य अत्रे पूल इथपर्यंत सदर वाहिनीसाठी खोदकाम करण्यात आले होते .मात्र सदर खोदकामामुळे रस्त्याची पूर्ण वाताहात असल्या होत असल्याने नागरिक प्रचंड नाराज झाले होते . शुक्रवारी ग्रामस्थांनी आक्रमक होत सदर खोदकाम बंद पाडले होते, याबाबत आम्ही जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की सदर ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती बाबतचे पैसे नगरपालिकेकडे भरले असून खोदकाम झाल्यानंतर तो रस्ता त्या पैशातून दुरुस्त करण्यात येणार आहे. मात्र विद्यानगर येथे सुस्थितीत असलेला रस्ता तीन वर्षांपूर्वी असाच केबल वाहिनीसाठी खोदण्यात आला होता मात्र तीन वर्षानंतरही त्या रस्त्याची अवस्था जैसे ते तैशीच होती त्यामुळे नागरिक आताच्या कामाबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करत होते.

मात्र आज सकाळी डबेवाला चाळीच्या पाठीमागील बाजूस सिमेंट कॉक्रीटचा रस्ता पुन्हा केबलवाहिनीसाठी खोदकाम सुरू झाल्याने तेथील स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत सदर काम बंद करण्यास भाग पाडले आहे. सदर खोद कामाला आमचा विरोध नसून खोदकाम झाल्यानंतर लगेचच रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी एक सह्याचे निवेदन तयार केले असून ते पोलीस स्टेशन कडे देण्यात येणार आहे. यावेळी सुधीर भाऊ गोडसे, प्रसाद अत्रे, बाळासाहेब लेंडे, नितीन पुरोहित, मुकुंद बेलसरे ,संजय निरगुडे, किशोर हरिश्चंद्रे, निलेश शिंदे, विजयकुमार हरिश्चंद्रे, धनंजय केळकर, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button