महाराष्ट्र
Trending

जेजुरी येथे राज्यस्तरीय शिवकालीन शस्त्र आणि शास्त्र चॅम्पियनशिप स्पर्धा मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यामंदिर यांचा द्वितीय क्रमांक….

जेजुरी येथे राज्यस्तरीय शिवकालीन शस्त्र आणि शास्त्र चॅम्पियनशिप स्पर्धा 2023 अतिशय उत्साहात संपन्न…

जेजुरी येथे राज्यस्तरीय शिवकालीन चॅम्पियनशिप स्पर्धा 2023 अतिशय उत्साहात संपन्न….


शिवशंभू मर्दानी कला आणि क्रीडा प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने रविवार दिनांक २०/८/२०२३ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर व ए सी हुंडेकरी ज्युनिअर कॉलेज जेजुरी या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व शस्त्र पूजन दिलीप आप्पा खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य पोपटराव ताकवले पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर जेजुरी. यांनी भूषवले व या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जेजुरी नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते जयदीप बारभाई, मार्तड देव संस्थांनचे माजी विश्वस्त संदीप आप्पा जगताप, अनिल रासकर सर , सुशांत कांबळे , उद्योजक प्रशांत लाखे , संदीप लोंढे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पठाण, पत्रकार संदीप रोमन व पत्रकार वर्ग,पालक वर्ग उपस्थित होते. उद्घाटनानंतर काही चित्तथरारक प्रात्यक्षिका मध्ये ढाल तलवार , लाठीकाठी, दांडपट्टा इ.कसरती सादर करण्यात आली.या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील पंधरा टीमने सहभाग घेतला होता. यामध्ये मुंबई ,कोल्हापूर, नाशिक, सातारा, येवला, शिर्डी ,लातूर, बारामती, फलटण ,गोंदवले दहिवडी ,राहता या अनेक ठिकाणाहून 350 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . यावेळी या स्पर्धेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंदिर या शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

.या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्रतिक यादव सर यांनी दिले आहे. प्रशिक्षक म्हणून त्यांच्या कष्टाला
अक्षरा इथापे,आस्था हापटे, साहिल झगडे,मुहम्मद पठाण,प्रसाद कापरे,रणजित खोमणे यांनी सुवर्ण पदक तसेच करण गोरे,समर्थ राणे,सिद्धी कटके,समृद्धी भिंगारकर,जान्हवी खोमणे,आर्यन शिर्के,वेदांत शिंदे राधिका शेंडकर यांनी रौप्य पदक मिळवून शाळेची पालकांची व प्रशिक्षकांची मान उंचावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button