जेजुरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये चुरशीची लढत! — योगेश जगताप व भक्ती कोरपड रिंगणात उतरणार….

जेजुरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये चुरशीची लढत! — योगेश जगताप व भक्ती कोरपड रिंगणात उतरणार
जेजुरी प्रतिनिधी :
जेजुरी नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना, प्रभाग क्रमांक १ मध्ये विशेषतः राजकीय रंगत वाढली आहे. या प्रभागात योगेश जगताप आणि भक्ती कोरपड — यांनी उमेदवारी जाहीर करून एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.
दोन्ही उमेदवारांच्या घोषणेमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
उमेदवारी जाहीर करताना त्यांनी सांगितले —
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने जेजुरी शहरात जयदीप बारभाई, गणेश निकुडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत असून
“प्रभाग क्रमांक १ च्या नागरिकांसाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि नागरिकांच्या अडचणी यावर ठोस उपाययोजना करण्याचा माझा निर्धार आहे. ‘काम बोलते, वचने नाही’ हेच माझे ब्रीदवाक्य असेल.”
योगेश जगताप यांनी महाराष्ट्र प्रवाहशी बोलताना असे सांगितले की सध्या प्रभागातील नागरिकांशी वैयक्तिक भेटीगाठी सुरू आहेत.
याच प्रभागातून उमेदवारी घोषित झालेल्या भक्ती कोरपड यांनी असे सांगितले की,
“प्रभाग क्रमांक 1, सुरक्षितता आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी या माझ्याकडे प्राथमिकता असतील. मी प्रत्येक घरातील स्त्रीचा आवाज म्हणून कार्य करणार आहे.”
प्रभाग क्रमांक १ हा जेजुरीतील द्रुतगतीने वाढणारा आणि नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या भागांपैकी एक मानला जातो.
रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि नागरिकांसाठी सार्वजनिक सुविधा ही या भागातील प्रमुख आव्हाने मानली जातात.
योगेश जगताप आणि भक्ती कोरपड या दोघांनीही आपल्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांवर भर देण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र प्रवाहशी बोलताना या दोन्ही उमेदवारांनी असे सांगितले की आमची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे. विद्यानगर प्रभागातील जनतेचे प्रश्न अगदी सामान्य असून ते सोडवण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असो जेजुरी विद्यानगर प्रभागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही प्रशासनात सर्वतोपरी प्रयत्न करू. विद्यानगर वासियांसाठी आमच्याकडे अनेक नवीन योजना असून त्या आमच्या जाहीरनाम्यात मांडूच.
सध्या या दोन्ही उमेदवारांचा प्रत्यक्ष वैयक्तिक भेटीगाठी यांद्वारे नागरिकांशी थेट संपर्क साधला जात आहे.
स्थानिक पातळीवर मतदारांमध्ये “कोण देईल विकासाचे खरे आश्वासन?” या प्रश्नावर चर्चा रंगली आहे.
जेजुरी नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक १ मधील ही लढत चुरशीची ठरणार आहे. संपूर्ण जेजुरी शहराचं या प्रभागाकडे लक्ष लागून राहिले आहे.


