महाराष्ट्रविशेषशहर
Trending

नवनाथ चौंडकर यांची मोफत रुग्णवाहिका ठरतेय जीवदान देणारी सेवा….

आईच्या शिकवणीतून उभा राहिला “मागेल त्याला मदत” चा उपक्रम

नवनाथ चौंडकर यांची मोफत रुग्णवाहिका ठरतेय जीवदान देणारी सेवा

जेजुरी प्रतिनिधी

सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत जेजुरी येथील नवनाथ चौंडकर यांनी सर्वसामान्यांसाठी “मागेल त्याला मदत” या भावनेतून मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली असून, आतापर्यंत गरोदर महिलांसह बहुसंख्य नागरिकांना या सेवेचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांमध्ये महिला रुग्णांचा समावेश आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले, अनेक कुटुंबांचे अश्रू पुसले.
या सेवेच्या मागे एक भावनिक कहाणी आहे. स्वतःच्या आई कै. सौ. रंजना बबन चौंडकर यांच्या आजारपणाच्या काळात उपचारासाठी वनवन भटकंती करताना नवनाथ चौंडकर यांनी सामान्य माणसाची असहाय्यता जवळून अनुभवली. त्या वेदनेतूनच समाजातील प्रत्येकाला संकटकाळात तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने आईच्या स्मरणार्थ त्यांनी ही मोफत ॲम्ब्युलन्स नि:स्वार्थ सेवा सुरू केली आहे. ही सेवा पुढील काळात कायस्वरूपी आणि अखंडपणे सुरू राहणार असल्याचे हे देखील त्यांनी सांगितले.
चौंडकर कुटुंबाचे कार्य केवळ रुग्णवाहिकेपुरते मर्यादित नाही. कोरोना काळात त्यांनी आवश्यक वस्तू आणि आरोग्य किटचे वाटप, तसेच सासवड नजिकच्या ममता बालसदन आणि जिव्हाळा वृद्धाश्रम येथे मदतीचा हात पुढे केला. गरीब, आजारी आणि असहाय व्यक्तींसाठी ते नेहमी धावून जातात. गावाकाडील मुलांना कपडे व शैक्षणिक साहित्य वाटप, आपत्कालीन मदत, आणि प्रत्येक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग ,समाजासाठी काहीतरी देणं लागतो हे सर्व त्यांच्या आईच्या शिकवणीचेच फलित आहे.
राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, सोनाली चौंडकर आणि नवनाथ चौंडकर यांनी आपल्या सेवाभावी, जमिनीवरच्या आणि माणुसकीपूर्ण स्वभावामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या “मागेल त्याला मदत” या तत्वावर आधारित रुग्णवाहिका सेवेमुळे जेजुरी परिसरात माणुसकीचा प्रकाश झळकू लागला आहे आणि समाजात एक नवी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button