

श्री मार्तंड देवसंस्थान न्यासातर्फे शहाजी राजे व छत्रपती शिवाजी महाराज भेट समूह शिल्प येथे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी श्री मार्तंड देवसंस्थान चे प्रमुख विश्वस्त अनिल रावसाहेब सौंदडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जेजुरीकर ग्रामस्थ, मानकरी, तसेच भाविक भक्त यांचे हातून पुष्प वृष्टी करण्यात आली. तत्कालीन विश्वस्तांच्या काळात जेजुरी गडावर छत्रपती संभाजी राजे व छत्रपती शिवराय या पिता पुत्रांच्या भेटीचे शिल्प साकारण्यात आले होते.

दरवर्षी मार्तंड देवस्थान तसेच जेजुरी शहरातील तमाम शिवप्रेमी यांच्याकडून शिवजयंतीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पपुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते.

यावेळी संभाजी ब्रिगेड जेजुरी शहर अध्यक्ष संदीप जगताप, जेजुरी , पुरंदर तालुका मराठा महासंघाचे उपाध्यक्ष अनिकेत हरपळे, , श्री मार्तंड देवस्थानचे माजी विश्वस्त सुधीर गोडसे, शिवसेना जेजुरी शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा भापकर, बाळकडू चे पत्रकार विक्रम माळवदकर , बहुजन हक्क परिषद शहराध्यक्ष यशवंत दोडके व जेजुरी मधील मानकरी ग्रामस्थ उपस्थित होते.


