युवकासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार व Interview Cracking Skill” या विषयावर व्याख्यानांचे आयोजन:-
*”युवकासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार व Interview Cracking Skill” या विषयावर व्याख्यानांचे आयोजन:-*
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयामध्ये दिनांक १०/ ०२/२०२४ रोजी महाविद्यालयात “युवकांसाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार” या विषयावर प्रीती चिंचवडे (स्वामी विवेकानंद केंद्र चिंचवड, पुणे) व “Interview Cracking Skill” या विषयावर मयूर गायकवाड (Head HR, Setco Spindles India Pvt. Ltd.,Pune) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी प्रीती चिंचवडे यांनी तरुणांसाठी स्वामी विवेकानंदांच्या विविध विचारांवर मार्गदर्शन केले व . मयूर गायकवाड यांनी मुलाखतीच्या विविध कौशल्यांवर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी महाविद्यालय व स्वामी विवेकानंद केंद्र चिंचवड आणि Setco Spindles India Pvt. Ltd. यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आला. त्या वेळी अरुणाताई मराठे, पुंडलिक माटे, स्वातीताई चोणकर, नचिकेत देशमुख, राहुल भालेकर हे उपस्थित होते.कार्यक्रमामध्ये प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा मालवडकर यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय साईश्रवण कुमार रेड्डी यांनी करून दिला व आभार वैभवी अहिवळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख प्रा. तेजाली देसरडा, प्रा.अजित पतंगे, प्रा.पूजा प्रजापती, प्रा.प्रणव मुळे, प्रा.प्रियंका डोशी, प्रा.अंकिता व्हटकर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.*