कौतुकास्पद! सासवड येथील लॉन्ड्री चालकाने ग्राहकाचे सापडलेले वीस हजार रुपये केले ग्राहकास सुपूर्द.


सध्याच्या कलियुगात माणुसकी बरोबरच प्रामाणिकपणा सुद्धा हरवत चालण्याची चित्र असतानाच एक वेगळा असा प्रकार सासवडच्या येथे घडला आहे . सासवडच्या लॉन्ड्री चालकाचा प्रामाणिकपणा मुळे सासवडमध्ये या लॉन्ड्री चालकाचे कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, ग्राहकाने इस्त्री साठी दिलेल्या कपड्यांमध्ये 20 हजार रुपये मिळाले होते.
सासवड शहरातील व्यापारी रशीद भाई आतार यांनी नेहमीप्रमाणे आपले कपडे इस्त्रीसाठी दिले. तेव्हा त्यात चक्क वीस हजार रुपये मिळाले. हरवलेली वस्तू पुन्हा मिळणार नाही असे अनेकांना वाटत असते. पण सासवड शहरातून एक वेगळीच बातमी समोर आलेली आहे. लॉन्ड्री चालक नाना मोरे यांनी ग्राहकाला त्यांचे पैसे परत केले आहेत लॉन्ड्री चालकाच्या प्रामाणिकपणामुळे सर्वत्र कौतुक होत आहे
नेमकं काय घडलं

सोमवारी २७ नोव्हेंबर) इस्त्री साठी ग्राहकांने कपडे दिल्यानंतर २८) मंगळवारी इस्त्री करताना लॉन्ड्री चालकाला पॅन्टीच्या खिशामध्ये पैसे आढळून आले त्यानंतर इस्त्री चालकाने ग्राहकाला फोन करून
याबाबतची माहिती दिली व दुकानात घेऊन आपले पैसे घेऊन जाण्याची विनंती केली संबंधित ग्राहकाला आपल्या खिशामध्ये पैसे होते याची पुसटही कल्पना नव्हती असे असताना सुद्धा लॉन्ड्री चालकाने आपली प्रामाणिकता दाखवत पैशाचा कुठलाही मोह न ठेवता ग्राहकाला परत देऊन टाकले. याबद्दल लॉन्ड्री चालक नाना मोरे यांचा ग्राहकाने सत्कार करून त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक केले व आभार व्यक्त केले


