धक्कादायक! दारु पिऊन पोलिसाना शिवीगाळ केल्याप्रकरणी जेजुरी पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल.

धक्कादायक! दारु पिऊन पोलिसाना शिवीगाळ केल्याप्रकरणी जेजुरी पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल.

नमस्कार दारूच्या नशेत बेधुंद असलेल्या एका तरुणाने पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस वर्षीय निलेश विजय चव्हाण या तरुणाने सोमवारी रात्री जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये आला .त्यानंतर तेथील संबंधित ठाणे अंमलदारांनी त्याला नाव व काय काम आहे असे विचारले असता त्याने आरडाओरडा करत पोलीस खात्याबद्दल व पोलिसांबद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला.

तसेच पळत जाऊन भिंतीवर डोके आपटून घेऊ लागला. त्याला पोलीस कर्मचारी यांनी त्वरित ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेले असता सरकारी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याने मद्यपन केले असल्याची निष्पन्न झाले. यावरून सदर तरुणा विरोधात जेजुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नांदे करत आहेत.


