महाराष्ट्रविशेषशहर
Trending

चंपाषष्ठी उत्सव 2023 :येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने अवघी दुमदुमली जेजुरी नगरी……

चंपाषष्ठी उत्सव 2023 :येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने अवघी दुमदुमली जेजुरी नगरी……

नमस्कार आज चंपाषष्ठी निमित्त अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील श्री मल्हारी मार्तंडाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अमावस्या पासून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीला या उत्सवाची सांगता होते. पौराणिक आख्यायिका नुसार मनि व मल्लासुर या दोन राक्षसांनी पृथ्वीवर हाहाहार माजवला होता. या असुरांचा संहार करावा म्हणून देवाने ,ऋषींनी भगवान शंकराचा धावा केला होता. त्यानंतर भगवान शंकराने श्री खंडोबाचा अवतार धारण केला होता व श्री खंडोबा व या राक्षसाचे पाच दिवस युद्ध चालले. यात भगवान शंकराने या राक्षसांचा वध केला. असुरावरील विजयाचा आनंद म्हणून ही चंपाषष्ठी साजरी केली जाते. महाराष्ट्र व कर्नाटकात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरोघरी नवरात्र उत्सव प्रमाणेच या सहा दिवस देवाचे घट बसवले जातात. तसेच जेजुरी गडावर होम हवन व अभिषेक इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. जेजुरी गडावर सलग सहा दिवस मार्तंड देवस्थान व चंपाषष्ठी अन्नछत्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांसाठी अन्नदानाची सोय करण्यात आली होती.

या काळात जेजुरी गडावर हजारो भाविकांनी श्री खंडेरायाचे दर्शन घेतले. या सहा दिवसांमध्ये दिव्यांग तसेच वृद्ध व्यक्तींना जेजुरी गडावर दर्शन घेण्याकरता मार्तंड देवस्थान तर्फे मोफत वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. आज चंपाषष्ठी चा मुख्य दिवस सोमवारी आल्याने जेजुरी गडावर प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. तर गडावर येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे भाविकांसाठी पिण्याचे पाणी,ईत्यादी चोख व्यवस्था करण्यात आली होती. अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली. वाहतूक योग्य प्रकारे नियंत्रित रहावी म्हणून जेजुरी पोलिस स्टेशन तर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button