महाराष्ट्रविशेषशहर
Trending

गुळूंचे येथील बालविवाह रोखण्यात जेजुरी पोलिसांना यश! पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

गुळूंचे येथील बालविवाहप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मयुर कुदळे

जेजुरी प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावच्या हद्दीत माळवस्ती येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी जेजुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विवाह सोहळा थांबवला. या प्रकरणी गुळुंचे गावच्या पोलीस पाटील यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून गणेश पोपट जाधव(वय २७ वर्ष),मंदाबाई पोपट जाधव दोघे रा. माळशिरस पुरंदर,लता लहुजी गोरगल, लहुजी रामचंद्र गोरगल दोघे रा.गुळुंचे आणि किरण यबुप्रसाद पौडेल रा. दत्तघाट पाडेगाव या पाच जणांविरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे कलम ९, १० व ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार करे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button