पक्षाने संधी दिल्यास संधीचे सोने करू…. विजय शेठ झगडे (प्रभाग क्रमांक एक. जेजुरी नगरपरिषद निवडणूक 2025

पक्षाने संधी दिल्यास संधीचे सोने करू…. विजय शेठ झगडे (प्रभाग क्रमांक एक. जेजुरी नगरपरिषद निवडणूक 2025
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र उमेदवारांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जेजुरी नगरीत सध्या सगळीकडे निवडणुकीची चर्चा रंगताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जेजुरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक एक यामधून निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारा बाबत वृत्त नुकतेच महाराष्ट्र प्रवाहने प्रसारित केले होते.
आज प्रभाग क्रमांक एक मधूनच इच्छुक असणारे सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन एक यशस्वी उद्योजक म्हणून जेजुरी नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत जिल्ह्यात आपली ओळख निर्माण करणारे श्री विजय शेठ झगडे यांच्याशी आम्ही बातचीत केली असता येणाऱ्या निवडणुकीत जनतेने जर माझ्यावर विश्वास ठेवला व त्यांनी सेवेची संधी दिली तर त्यांचा विश्वास सार्थ ठरवत त्या संधीचे सोने करू अशी ग्वाही त्यांनी महाराष्ट्र प्रवाहशी बोलताना दिली. सध्या प्रशासकीय पातळीवर निवडणूक प्रक्रियेने जोर धरला आहे.जेजुरीतील सुप्रसिद्ध शिवानंद हॉटेल रेस्टॉरंट चे सर्वेसर्वा विजय शेठ झगडे यांना सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड आहे व या सामाजिक कार्याला जनतेची व प्रशासकीय जोड मिळावी म्हणूनच ते निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांच्याशी आम्ही बातचीत केली असता त्यांनी असे सांगितले. की विद्यानगर प्रभाग क्रमांक एक आज जेजुरीतील मोठी लोक वस्ती असलेला प्रभाग म्हणून ओळखला जात आहे.याच प्रभागाच्या अनेक समस्या आहेत जसे की चांगले रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता असे अनेक मूलभूत समस्या बरोबरच जॉगिंग पार्क, वाचनालय अशा अनेक संकल्पना त्यांना सत्तेच्या माध्यमातून राबवायच्या आहेत. नुकतेच त्यांनी तालुक्याचे आमदार विजय बापू शिवतरे यांच्याकडे त्यांच्या संपूर्ण सहकारी सह पाठपुरावा करून जेजुरी दवणे मळा ते बेलसर पर्यंतचा सुमारे 14 कोटी रुपये खर्चाचा सिमेंट रस्ता मंजूर करून घेतला आहे हा रस्ता जेजुरीसाठी वरदान ठरणार आहे. प्रामाणिक तळमळ असेल व कार्य करण्याची आवड असेल तर कोणतेही काम सहज साध्य होते हे त्यांनी दाखवून दिले आहे. यावर्षी दवणे मळा परिसरात गणेश उत्सव काळात तीन गणेशोत्सव मंडळांना एकत्र करत एक गाव एक गणपती संकल्पना त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे.
कार्यसम्राट आमदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून त्यांना विद्यानगर नव्हे तर संपूर्ण जेजुरी शहराचा विकास करणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. पक्षाने संधी दिल्यास प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण पुरुष किंवा महिला गटासाठी कुटुंबातून उमेदवार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या त्यांनी प्रभागातील मतदारांच्या व्यक्तिगत भेटीगाठीवर जोर दिला असून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. येणारा काळात मोठ्या धडाडीने प्रचारात उतरणार असून आपल्या संकल्पना आपल्या विकासाची योजना या सामान्य मतदारांना समजावून सांगून त्यांना विकासाचे महत्त्व पटवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझी लढाई ही सत्तेसाठी नसून जनतेच्या विकासासाठी व त्यांच्या हक्काची लढाई असल्याची त्यांनी सांगितले. संधी मिळाल्यास सोमवती पालखी मार्ग व प्रभागातील रस्ते नीटनेटके स्वच्छ चांगल्या दर्जाचे तसेच स्ट्रीट लाईट या सुविधा कशा देता येतील याचा कटाक्षाने लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सण, सार्वजनिक उत्सव यात सहभागी होऊन त्यापेक्षा आपण जनतेला विकासाची कोणते व्हिजन देऊ शकतो. व विकासाचं मॉडेल घेऊनच आपण जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.


