क्रीडामहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसंपादकीयसामाजिक
Trending

प्रभाग 1 मध्ये उमेदवारांची भाऊ गर्दी! मात्र जनतेचा कौल कुणाला?? जेजुरी नगरपरिषद निवडणूक.

प्रभाग 1 मध्ये उमेदवारांची भाऊ गर्दी! मात्र जनतेचा कौल कुणाला??

नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया सध्या वेगात सुरू असून नगराध्यक्ष पदाची तसेच प्रभागानुसार सदस्य पदाची आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून जेजुरी नगरपरिषदेचा नगराध्यक्ष कोण होणार व सत्ता कोणाची येणार याच्या आता चर्चा चौकाचौकात रंगू लागल्या आहेत.

जेजुरी नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक एक हा नेहमीच महत्त्वपूर्ण मानला जातो. प्रभाग क्रमांक एक मध्ये विद्यानगर ही मोठी वसाहत मानली जाते. जेजुरीच्या आसपासची गाव असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातील लोकांनी नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने येथे स्थालांतर केले. व ते येथे स्थायिक झाले.त्या अनुषंगाने येथे मोठी वसाहतच निर्माण झाली. लोकसंख्या वाढत गेल्याने रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी इत्यादी समस्या निर्माण झाल्या. आज याच प्रभागातील मतदारांची संख्या दोन हजारच्या वर पोहोचली आहे.

जेजुरीचे सत्ता करणाचे महत्वाचे घटक असलेले व ज्यांच्याभोवती जेजुरीचे राजकारण फिरते असे जेजुरीचे माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बारभाई यांचे निवासस्थान याच प्रभागात असून गेली 30 ते 40 वर्ष या प्रभागावर त्यांची जोरदार पकड आहे.

आता होणाऱ्या जेजुरी परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून बारभाई कुटुंबीयांकडून निवडणूक लढवली जाणार की नाही याबाबत सध्या संभ्रम आहे. व याबाबतचा निर्णय अजून तरी त्यांनी जाहीर केलेला नाही. सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये दोन्ही सदस्य पद खुल्या वर्गासाठी आरक्षित झाले असून एक सदस्य पदासाठी महिला आरक्षण असणार आहे. त्यातच गत वेळेस चे काँग्रेस कडून लढलेले उमेदवार योगेश जगताप हे सुद्धा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. तर त्यांच्या जोडीला वैभव कोरपड हेसुद्धा इच्छुक असून ते आपल्या पत्नीला रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही तरुण उमेदवारांचा प्रभाग क्रमांक एक मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असो,नवरात्र उत्सव मंडळ असो यामध्ये सर्वांनाच कायमच मोलाची साथ आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या कोणतेही अडीअडचणीसाठी ते कायमच धावून जात असतात.हे दोन उमेदवार पक्षाने संधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्याकडून किंवा पक्ष पुरस्कृत आघाडी किंवा पॅनल मधून लढू शकतात. योगेश जगताप व वैभव कोरपड यांचा जनसंपर्क दांडगा असून युवा कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे चांगले संबंध आहेत. व या दोन्ही उमेदवारांच्या मागे बारभाई कुटुंबीयांची ताकद असल्यामुळे त्यांच्यासाठी सध्या वातावरण अनुकूल मानले जात आहे. मात्र काँग्रेस पक्षाची गेली पाच वर्ष सत्ता असताना योगेश जगताप हे काँग्रेसमध्येच होते. व ते स्वीकृत नगरसेवक सुद्धा होते. त्या पाच वर्षात काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक एक साठी किती विकास निधी आणण्यात आला याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. व योगेश जगताप त्या पाच वर्षात प्रभागासाठी आणलेली निधीच्या जोरावरच मतदारासमोर जाणार असल्याचे सांगत आहे.

मात्र विरोधी पक्षाकडून सध्या तरी मागच्या वेळेस चे भाजपचे उमेदवार गणेश भोसले यांचेच नाव सध्या आघाडीवर आहे. पराभवानंतर खचून न जाता पक्षाने गणेश भोसले यांना जेजुरी शहर अध्यक्ष पद सोपवले व त्यांनी जेजुरी शहरात भाजप वाढवण्यामध्ये मोठा हातभार लावला व भाजपला जोरदार ताकद मिळवून दिली. पक्षाचे विकासाचे धोरण असो सरकारमधील विविध शासकीय योजना असो या सर्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा गणेश भोसले यांनी जोरदार प्रयत्न केला. व त्याचा लाभ सर्वसामान्य गरिबापर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी सुद्धा झाले.तसेच महिलांसाठी मोफत यात्रेचे आयोजन असो. व विविध उपक्रम असो याद्वारे त्यांचा तळागाळात संपर्क मोठा आहे. तरुण वर्ग व महिला वर्गांचा मोठा पाठिंबा गणेश भोसले यांच्या पाठीशी आहे. व माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची सुद्धा ताकद भाजपच्या उमेदवारांच्या मागे दिसून येणार आहे.

मात्र यावेळेसचे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे प्रभाग क्रमांक एक मधून अनेक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहेत. त्यात प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चौंडकर यांचे नाव आघाडीवर आहे. ते सुद्धा आपल्या पत्नीला रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. गेली दहा ते पंधरा वर्षे सामाजिक कार्यात व लोकांना मदत करणारे परिचित नाव म्हणून नवनाथ चौंडकर सर्वश्रुत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच नवनाथ चौंडकर यांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. व त्यांचा मित्रपरिवार त्यांच्यासाठी रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर भाजपमधून चंद्रकांत जगताप, उमा कुंटे,कल्पेश सूर्यवंशी हे सुद्धा प्रभाग एक मधून इच्छुक उमेदवार आहेत. अनेक उमेदवारांची नावे चर्चेत आल्याने सध्या प्रभाग क्रमांक एक हा जेजुरीमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

मात्र प्रभाग एक मध्ये विकास कामे झाली का?पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटला का?स्वच्छता व विद्यानगर मधील नागरिकांच्या समस्या कोणत्या ह्या जाणून घेण्याच्या कोणी प्रयत्न केला का? याचा सुद्धा विचार नागरिक मतदान दिवशी नक्कीच करतील. निवडणुकीच्या रिंगणात उभे असणारे उमेदवार प्रभाग एक मधील नागरिकांसाठी कोणत्या योजना सत्तेच्या माध्यमातून राबवणार आहेत याचे सुद्धा चित्र जनतेसमोर त्यांना मांडावे लागणार आहे. प्रत्यक्ष उमेदवारांचे नामांकन दाखल करताना पक्ष कोणाला उमेदवारी देतो हे कळेलच तूर्त सर्व इच्छुक उमेदवारांनी आपली ताकद अजमावण्यास सुरुवात केली आहे हे नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button