आरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसंपादकीयसामाजिक
Trending

मुळशी तालुका शालेय कराटे स्पर्धेत यश

मुळशी तालुका शालेय कराटे स्पर्धेत यश

जेजुरी प्रतिनिधी :

योद्धाच्या रणरागिणीचा मुळशीत डंका

क्रीडा व युवक संचानालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद,पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित मुळशी तालुका शालेय कराटे स्पर्धा आज दि.25 ऑगस्ट रोजी पार पडली.
या मुळशी तालुका शालेय कराटे स्पर्धेत योद्धा डिफेन्स इन्स्टिटयूट मारुंजी येथील विध्यार्थिनी कु श्रावणी रोमण हिने येथे झालेल्या 40, ते 44,,या वजनगटात आपला प्रथम क्रमांक नोंदवला.
या विजया मुळे रोमण मित्र परिवार व वाईकर मित्र परिवाराने आनंद व्यक्त करत श्रावणी हिचे अभिनंदन करत या पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत आपले ध्येय गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या कराटे स्पर्धेत मुले व मुली मिळुन स्पर्धकांनी भाग घेतला होता.पुणे जिल्हापरिषद क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप वाघचौरे सर व त्यांच्या संपुर्ण टीमने या स्पर्धेचे नियोजन व कामकाज चोखपणे पार पाडले
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button