महाराष्ट्रविशेषशहर
Trending

श्री खंडेरायाच्या त्रिकाळ पूजवेळी वाहण्यासाठी हळकुंडा पासून हळद बनविण्याचे मशीन श्री खंडेराया चरणी अर्पण….



श्री खंडेरायाच्या त्रिकाळ पूजवेळी वाहण्यासाठी हळकुंडा पासून हळद बनविण्याचे मशीन श्री खंडेराया चरणी अर्पण

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदेवत असलेल्या श्री खंडेरायाच्या पूजेत भंडारा (हळद) याला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. श्री खंडेरायाच्या चरणी आल्यानंतर भंडारा उधळल्याशिवाय दर्शन वारी पूर्ण होतच नाही. येळकोट येळकोट चा जयघोष करत भाविक भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण करत असतात त्यामुळेच देवा तुझी सोन्याची जेजुरी असे नावच प्रचलित झाले आहे.आज दि. 02 एप्रिल रोजी
कै. विजय यशवंत कोणे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त श्री विनोद विजय कोणे (विजय केटरर्स, पुणे) यांनी हळकुंडा पासून भंडारा तयार करण्याचे मशीन देवसंस्थानास देणगी स्वरूपात दिली.

सदरील मशीनचे आज पूजा- विधी करून श्री विनोद कोणे, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे यांचे शुभहस्ते व पुजारी सेवेकरी गणेश आगलावे, कर्मचारी सेवेकरी वर्ग यांचे उपस्थिती मध्ये अनावरण करण्यात आले.

तसेच हळकुंडा पासून तयार करण्यात आलेली हळद श्री खंडेराया चरणी अर्पण करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button