महाराष्ट्रविशेषशहर
Trending

“जेजुरी शहरात सुरू असलेल्या सर्व बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार” मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले.

इमारत तर पाडली…. पण शहरातील विनापरवानगी व अनधिकृत बांधकामाचे काय?

जेजुरी शहराच्या अत्यंत मध्यवर्ती भागात असलेल्या खोमणे आळी परिसरातील बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत ही रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी अचानक झुकल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने सहा, पोलीस निरीक्षक वाकचौरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व नागरिकांना तिथे संचार करण्यास मज्जाव करण्यात आला होता. रात्रभर पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यामुळे सोमवारी पहाटेपासूनच जेजुरी नगरपरिषद व पुणे महानगरपालिकेच्या वतीने सदर इमारत जमीन दोस्त करण्यात आली. व स्थानिकांनी सुटकेचा विश्वास सोडला पण यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जेजुरी शहर नगरपालिका हद्दीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून बहुतांश मोठी तीन मजली, पाच मजली बांधकामे विनापरवानगीच केली जात आहे. काही सुज्ञ नागरिक आवश्यक त्या सर्व परवानगी मिळवून बांधकामे करीत आहेत.मात्र तरीही परवानगी न घेताच बांधकाम करण्याचा सपाटा सध्या लावला आहे. सदर पाच मजली इमारतीला सुद्धा नगर परिषदेच्या वतीने नोटीस बाजवण्यात आली होती मात्र तरी संबंधित बांधकाम सुरूच राहिले. व त्यातून हा धक्कादायक प्रकार घडला मात्र यातून नगर परिषदेच्या बांधकाम विभागा कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच संबंधित घटना घडून आज तीन दिवस झाले. तरी याबाबतीत पुढे काय कारवाई झाली. याबाबत अजून काही कळले नाही.आम्ही बांधकाम विभागाशी संपर्क केला असता सन 2023 पासून ते जुलै 2025 पर्यंत फक्त 65 अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मग गेल्या अडीच वर्षात फक्त पूर्ण संपूर्ण शहरात फक्त 65 बांधकामे झाली का काय ?असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामाबाबत नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या बांधकाम विभागाकडे विषय जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशी कोणती अनुचित घटना घडू नये म्हणून बांधकाम विभागाने खबरदारी घेतली आहे पाहिजे.

यासंबंधी जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी असे सांगितले की “जेजुरी शहरातील सध्या सुरू असलेल्या बांधकामांचा सर्वे करून सदर बांधकाम व्यावसायिक आहे का/ निवासी तसेच इतर बांधकामांना धारकांना धोकादायक आहे का? बांधकामाचे स्ट्रक्चल ऑडिट झाले आहे का? त्यानुसार कारवाई करण्याची नियोजन करण्यात येणार आहे. तसेच उंच व धोकादायक वाटणारे इमारतींचे स्ट्रक्चल ऑडिट करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याबद्दल नागरिकांमध्ये सध्या नाराजी आहे. सध्या जेजुरी शहरांमध्ये जवळपास बहुतांश रस्ते खड्ड्यात गेल्याची परिस्थिती आहे. जानुबाई आळी मध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यापासून खड्ड्यांमुळे व चिखलामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे ह्याच रस्त्यावरून सुमारे तीन महाविद्यालय शाळा यांना जाणाऱ्या विद्यार्थी ये जा करत असतात .तसेच यात्रेकरू भाविक ही मोठ्या प्रमाणावर इथून वर्दळ करत असतात .मात्र तरीही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत होते. हा प्रश्न अजूनही नागरिक विचारत आहे. सध्याच्या माहितीनुसार सदर खड्डे बुजवले गेल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button