जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त गणेश भोसले व मित्रपरिवार यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी अन्नदान…

जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त गणेश भोसले व मित्रपरिवार यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी अन्नदान…
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा पालखी सोहळा मंगळवार दिनांक २३ रोजी जेजुरी येथे मुक्कामी होता. या निमित्ताने जेजुरी शहर भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष गणेश भोसले व मित्रपरिवार यांच्यावतीने माऊलीच्या पालखी साठी अन्नदान करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा ना. चंद्रकांत दादा पाटील व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी ते पंढरपूर मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे त्या अनुषंगाने जेजुरी शहरांमध्ये हजारो वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली .

या उपक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते भारतीय जनता पार्टी संदीप दादा खर्डेकर पुणे जिल्हा दक्षिण ग्रामीण शेखरजी वडणे पुणे जिल्हा भटक्या जाती जमाती रवींद्र खोमणे प्रदेश युवा मोर्चा महामंत्री श्रीकांत ताम्हणे पुणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहलताई दगडे
यांच्या मार्गदर्शना अंतर्गत अन्नदान व इतर कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी शहर चे माजी भाजपा शहर अध्यक्ष गणेश भोसले यांनी केले होते.
याप्रसंगी महिला मोर्चा जेजुरी शहराध्यक्ष उमाताई बजरंग खुंटे, . महिला मोर्चा सरचिटणीस अर्चनाताई बोरकर, माजी सरचिटणीस चंद्रकांत जगताप , सविता घोडके, सोमनाथ मदने, सचिन कापडे, सागर खोमणे, कल्पेश सूर्यवंशी, नितीन जाधव ,मयूर केंजळे ,अमोल माने, नितीन उगाडे, दीपक पवार ,क्षितिज जगताप, योगेश भोसले, अथर्व भोंगळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



