
महाराष्ट्र हादरला ! अंधश्रद्धेपायी गुप्तधनासाठी नऊवर्षीय मुलाची हत्या.. खळबळ जनक घटना
२१ व्या शतकाला कायम विज्ञानाचे शतक मानले जाते. माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला व त्याने विज्ञानाच्या नवीन रेषा पार केल्या. मात्र मानवाने कितीही विज्ञानात प्रगती केली असली तरी आजही त्याच्या मनातली अंधश्रद्धा काही संपायला तयार नाही व बऱ्याच वेळा या अंधश्रद्धे पायी त्याच्याकडून अमानवी कृत्ये घडतात. महाराष्ट्रात असाच एक खळबळ जनक व संताप जनक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्तधन मिळवण्याच्या लालसेपोटी एका नऊ वर्षाच्या मुलाचा चक्क नरबळी दिल्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे. नाशिक ग्रामीण येथील वडनेर खाकुर्डी या पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक १६ जुलै२०२३ रोजी पोहणे तालुका मालेगाव येथील अनिल फुलसिंग सोनवणे यांचा नऊवर्षाचा मुलगा कृष्णा अनिल सोनवणे हा शेतात खेळण्यासाठी गेला. मात्र पुन्हा घरी परत न आल्याने कुटुंबातील व्यक्तीनी त्याची शोधाशोध करून अखेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या दरम्यान पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला होता मात्र दिनांक 18 जुलै रोजी पोलीस पाटील पोहाणे यांनी पोलिसांना माहिती दिली की पुणे गावच्या हद्दीतील मांजरीनाला येथील शेतातून दुर्गंधीयुक्त वास येत आहे. यावेळी पोलीस पथकांनी मालेगावचे तहसीलदार यांच्या उपस्थितीत घटनास्थळाला भेट देऊन सदरची जागा उकरण्यात आली. यावेळी त्यांना मातीच्या ढिगाराखाली प्रेथ आढळून आले. सदरचे प्रेत नऊ वर्षीय कृष्णा सोनवणे याचे असल्याचे निष्पन्न झाले. मग पोलिसांनी या गुन्ह्यात ३६४,३०२,२०१ या कलमाने वाढ करण्यात आली.
सदर घटनेचे गांभीर्य पाहता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग पुष्कराज सूर्यवंशी, यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाना गुन्हा उघडकीस आणण्याच्या साठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या पथकाने पोहाणे परिसरात घटनेचा तपास सुरू केला सदर घटनेतील अज्ञात आरोपी शोधण्यासाठी कसोटीने प्रयत्न सुरू केले. तसेच त्यांच्या शोध घेण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक फिंगरप्रिंट पथक तसेच फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते .सदर घटनेतील घटनास्थळावर मिळून आलेल्या पुरण्याच्या वस्तू तसेच श्वान पथकाच्या मदतीने या गुन्ह्यातील आरोपी हे पोहाणे गावातील असल्याची खात्री झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा वडनेर खाकुर्डी पोलिसांनी १) उमाजी गुलाब मोरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार२) रोमा बापू मोरे ३)रमेश लक्ष्मण सोनवणे ४)गणेश लक्ष्मण सोनवणे व ५) लक्ष्मण नवल सोनवणे यांच्यासह मिळून यातील मयत मुलगा कृष्णा आणि सोनवणे याला दिनांक १६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास फूस लावून पळवून नेऊन त्यास धारदार चाकू, ब्लेडने गळ्यावर करून ठार मारले. असल्याबाबत गुन्ह्याची तपासात कबुली दिली आहे .यातील आरोपी क्रमांक एक ते चार यांना अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाच्या तपासात प्राथमिक दृष्ट्या हा खून गुप्तधनाच्या लालसेपोटी आरोपींनी केला असल्याचा निष्पन्न झाले आहे. घटनेचे गांभीर्य पाहता न्यायालयाने अटक आरोपींना सात दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केलेली असून सदर गुन्ह्यांचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण पुष्कराज सूर्यवंशी करत आहे .
हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण पुष्कराज सूर्यवंशी, यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक अंकुश नवले ,तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सह पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील ,पोलीस हवालदार चेतन सवतकर ,पोलीस नाईक देवा गोविंद, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी ,विजय वाघ, नितीन सपकाळे ,गौतम बोराळे, संतोष हजारे, कदम, वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार सह पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस हवालदार हिम्मत चव्हाण, बापू महाजन ,महिला पोलीस हवालदार निशा साळवे ,पोलीस नाईक बावकर ,पोलीस कॉन्स्टेबल रणजीत साळुंखे, गजानन कासार, महेंद्र पवार, किरण कुदळे ,यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने सदर गुन्हा उघडकीस आणला असून आरोपींना अटक केली आहे तपास पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पथकास १५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले आहे.



