

धक्कादायक! पत्रकाराला भर रस्त्यात मारहाण… रोहित पवार यांचा सरकारवर निशाणा…

पाचोरा जिल्हा जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना काही दिवसापूर्वी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली होती. त्याचे प्रत्यंतर आता आले असून पत्रकार संदीप महाजन यांना भर रस्त्यात गाडी आडवी पाडून मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे, तर आपल्याला झालेली मारहाण ही आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी केल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे

सध्या असून हाच व्हिडिओ आमदार रोहित पवार ट्विटर वरून शेअर करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. ..

ते म्हणतात…
पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….
विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे.ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल.

आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना , स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का ? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे.


