शैक्षणिक
Trending
आहिल्यादेवी विद्या मंदिर आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये नऊ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांती दिन साजरा..
पुण्यश्लोक आहिल्यादेवी विद्या मंदिर आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये नऊ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांती दिन साजरा केला गेला .याप्रसंगी स्वातंत्र्य लढ्यातील अनेक वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकार केल्या .
तसेच ,’मेरी माटी मेरा देश ‘या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ दिली गेली . ही शपथ प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती गायकवाड मॅडम यांनी दिली .
क्रांती दिनानिमित्त प्रशालेच्यावतीने जेजुरी नगरीमध्ये प्रभात फेरी काढली गेली. तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री ताकवले सर, विभाग प्रमुख श्री वाबळे सर ,पर्यवेक्षक श्री रासकर सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी , सर्व विद्यार्थी प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते.