गौतमी पाटील व माधुरी पवार यांच्यातील वाद संपुष्टात…. तर दोघांनी बांधले मैत्रीचे धागे….
गौतमी पाटील व माधुरी पवार यांच्यातील वाद संपुष्टात…. तर दोघांनी बांधले मैत्रीचे धागे….
नमस्कार, आजची बातमी जर हटके असून मनोरंजन विश्वातील आहे .गेल्या वर्षभरापासून गौतमी पाटील या नावाने तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. डीजे च्या तालावर लावणी नृत्या वरती नृत्य करत गौतमी पाटील हिने आपला महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मात्र गौतमी पाटील यांच्या। अगोदर महाराष्ट्रात अनेक लावणी स्टार आहेत. त्यातील माधुरी पवार हे नाव सुद्धा लोकप्रिय आहे माधुरी पवार ह्या उत्कृष्ट नृत्य कलाकार असून तिने काही मराठी मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे.
मात्र गौतमी पाटील यांची लोकप्रियता वाढल्यानंतर त्यांच्या इतर प्रतिस्पर्ध्यांवर व्यावसायिक परिणाम होऊ लागला असे बोलले जाऊ लागले. तसेच गौतमी पाटील यांचे काही नृत्य हे वादात सापडले असल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. यात माधुरी पवार ह्या सुद्धा होत्या. तर गौतमी पाटील यांनी सुद्धा त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. बऱ्याच वेळेला या दोघींमध्येही वादाची ठिणगी पडली.
मात्र या दोघींचा वाद संपुष्टात आणण्याचे काम सुभाष यादव या अभिनेत्याने करून दाखवले आहे. “टिओस कॅफे” च्या उद्घाटनाच्या निमित्ताने सुभाष यादव यांनी या दोन्ही सेलिब्रिटींना निमंत्रित केले. त्याच बरोबर भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई ,छोटा पुढारी घनश्याम दराडे व इतर सेलिब्रिटींना सुद्धा या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सुभाष यादव यांनी मोठ्या कल्पकतेने या दोघींची ही समजूत काढत त्यांच्यातील वाद मिटवला. व दोघेही मैत्री दिनाच्या निमित्ताने एकामेकींना फ्रेंडशिप बँड बांधले त्यावेळी उपस्थितानी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.
या कार्यक्रमाच्याप्रसंगी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई ,छोटा पुढारी घनश्याम दराडे ,अभिनेत्री रुक्मिणी सुतार, मयुरी घाडगे, स्नेहल भोंग, प्रमला साळुंखे, रश्मी दहिरे टिओस कॅफेच्या कल्याणी ढमढेरे ,नयना हजारे, स्नेहाली ढमढेरे उपस्थित होत्या.