महाराष्ट्र
Trending

शिवसेनेच्या वतीने जेजुरी मध्ये आज धरणे आंदोलन… मात्र काँग्रेसकडून त्यावर जोरदार टीका….

शिवसेनेच्या वतीने आज जेजुरी मध्ये धरणे आंदोलन… मात्र काँग्रेसने केली त्यावर टीका….

नमस्कार दिनांक 14 ऑगस्ट रोजी जेजुरी शहर शिवसेनेच्या वतीने जेजुरी नगर परिषदेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जेजुरी शहर शिवसेनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात पुढील आरोप करण्यात आले आहेत. जेजुरी शहरातील पाण्याची बिकट समस्या व विविध मूलभूत समस्येच्या बाबतीत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जेजुरी शहरात सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असून येणारे पाणी अत्यंत गढूळ असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मांडकी डोह योजनेचे विज बिल न भरल्यामुळे कनेक्शन कट करण्यात आले आहे .तसेच जेजुरी शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून मलेरिया, डेंगू चिकनगुनिया इत्यादी आजाराचा फैलाव झाला असल्याचे सांगण्यात येत असून जेजुरी शहरातील भाजी मंडईची अत्यंत दुरवस्था झाली असून अश्या घाणीतच नागरिकांना भाजीपाला विकत घ्यावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच जेजुरी शहरातील मल्हार व्हिला लगत असणाऱ्या कचरा डेपो बाबत वारंवार तक्रार करून देखील त्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही. तसेच जेजुरी शहरातील गेल्या काही वर्षात झालेली रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असून त्यातील काही रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. तसेच जेजुरी शहरातील अनेक स्थानिक कामगार नगरपालिकेत सेवेत असताना जेजुरी नगरपालिकेमध्ये बाहेरच्या १६ कामगारांना कायम केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गोष्टीचा निषेध करत स्थानिक कामगारांना कायम सेवेत करून घ्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

मात्र आजच्या या धरणे आंदोलनावरून काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक व नेते अजिंक्य देशमुख यांनी हे सर्व येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टंटबाजी असल्याची टीका केली आहे. तसेच मांडकी डोह योजनेचा प्रश्न तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी का सोडवला नाही.. तसेच आता सत्ता भाजप शिवसेना यांची असल्याने संपूर्ण सत्ता व मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचा असताना सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यात तुम्हाला अडचण काय? असा प्रश्न देखील काँग्रेस कडून विचारण्यात आला आहे. तसेच माजी नगराध्यक्षा विना सोनवणे यांनी देखील या आंदोलनावर टीका केली असून गेली १७ महिने प्रशासन राज असताना तेव्हा आंदोलन करायला का सुचले नाही! असा खोचक प्रश्न देखील विचारण्यात आला आहे. तर माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनीही या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत..एक चोरलेला पक्ष आणी चिन्ह घेऊन..निघाले जेजुरीकरांना फसवायला..१० वर्ष तालुक्याचे आमदार व राज्यमंत्री पद असतांना जेजुरीच्या विकासासाठी १ रूपयाचा निधी न देणाऱ्यांना जेजुरीच्या विकासावर बोलायचा अधिकार काय?
आंदोलनाच्या नावाखाली चमकोगीरी नुसती..मुख्यमंत्री यांच्याच पक्षाचा आणी हे निघाले आंदोलन करायला..
लवकरच करणार यांची पोलखोल..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button