महत्वपूर्ण! डॉक्टरनी यापुढे जेनेरिक औषधे लिहून न दिल्यास त्यांच्यावर होणार ही कारवाई……
नमस्कार भारतात वैद्यकीय क्षेत्र हे आज एक मोठे शेत्र मानले जाते. आज ग्रामीण भागापासून मोठ्या शहरापर्यंत लहान लहान दवाखाने ते मोठी मोठी भव्य मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. साथीचे आजार विविध प्रकारचे संसर्गित आजार तसेच इतर कारणांमुळे रुग्णालयात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र औषधांच्या वाढलेल्या प्रचंड किमती त्यामुळे अक्षरश रुग्ण बेजार होतो. त्यामुळेच तुलनेने स्वस्त असणारे जेनेरिक मेडिकल्स ची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तरी बऱ्याच वेळेला कमी किमतीत मिळणारी जेनेरिक औषधे लिहून देण्याकडे काही डॉक्टर्स टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले होते.
यामुळेच राष्ट्रीय वैद्यक आयोगाने काही नवींन नियम डॉक्टरांसाठी लागू केले आहेत. दोन ऑगस्ट रोजी जारी केलेल्या एका निर्णयानुसार यापुढे डॉक्टरांना रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून द्यावी लागणार आहेत. व तसे न केल्यास त्यांच्या वर कारवाई होऊ शकते व प्रसंगी त्यांचा परवानाही काही काळासाठी रद्द होऊ शकतो.
जेनेरिक औषधे ही इतर ब्रॅण्डेड औषधाच्या बरोबरीनेच प्रभावी असतात. तसेच ही औषधे जवळपास 50 ते 70 टक्क्यांनी स्वस्त असतात. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या वरील औषधाचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल असे बोलले जात आहे. बऱ्याच वेळेला औषधाच्या मोठ्या रकमेच्या बिलावर संबंधित रुग्णांकडून सवलत मागितली जाते .काही वेळेस ती दिली जाते व काही वेळा ती नाकारली सुद्धा जाते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वादाचे खटके उडतात. मात्र या नव्या निर्णयामुळे रुग्णांच्या औषधाच्या खर्चात बचत होईल असे बोलले जात आहे.