स्वातंत्र्यदिनानिमित्त जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक व शहिदांचा सन्मान…


नमस्कार आज भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशात अभूतपूर्व असा उत्साह पाहायला मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरा माटि मेरा देश हे अभियान देशातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे राबवावे असे आव्हान केले आहे.


या आव्हाना अंतर्गत आज जेजुरी पोलीस स्टेशन येथे मेरी माटी मेरा देश( विरो का नमन )या अभियानांतर्गत जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील स्वातंत्र्यसैनिक घोलप शांताबाई नारायण .राहणार निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे ,२)गायकवाड सीताबाई रामचंद्र राहणार निरा३) कैलासवासी हिराबाई प्रल्हाद सातभाई यांचा मुलगा चंद्रकांत प्रल्हाद सातभाई राहणार जेजुरी ४)शहीद शंकर राजाराम शिंदे यांच्या पत्नी छाया शंकर शिंदे राहणार पिंगोरी तसेच शहीद चंद्रकांत ज्ञानोबा टेकवडे यांचे वडील ज्ञानोबा टेकवडे यांचा पोलीस स्टेशन येथे सत्कार समारंभ घेऊन सन्मान करण्यात आला यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




