महाराष्ट्र
Trending

अखेर ठरलं! जेजुरीत या ठिकाणी, या दिवशी, होणार शासन आपल्या दारी कार्यक्रम….

अखेर ठरलं जेजुरीत या ठिकाणी, या दिवशी, होणार शासन आपल्या दारी कार्यक्रम….

नमस्कार सलग चार वेळा रद्द झालेला जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रम हा सोमवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी नवीन पालखी मैदान येथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दिनांक 3 जुलै ,आठ जुलै १३ जुलै व 23 जुलै अशा या कार्यक्रमाच्या तारखा ठरल्या होत्या. मात्र काल मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ अमोल शिंदे यांच्या सहीने प्रसिद्ध झालेल्या पत्रात दिनांक सात ऑगस्ट रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम साठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली आहे असे नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे जेजुरीत हा कार्यक्रम नवीन पालखी मैदानावरच होणार असून या कार्यक्रमासाठी सुमारे ५००० स्क्वेअर चौ, मीटरचा मंडप उभारण्यात येणार आहे. या मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.

तसेच या कार्यक्रमासाठी सरपंच, शासकीय अधिकारी, व्हीआयपी इत्यादीना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच या निमित्ताने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button