महत्त्वाचे ! जेजुरीत उद्या होणाऱ्या” शासन आपल्या दारी” कार्यक्रमामुळे वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल….


महत्त्वाचे ! जेजुरीत होणाऱ्या” शासन आपल्या दारी” कार्यक्रमामुळे वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल….

सलग चार वेळा रद्द झालेला जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रम उद्या दिनांक ७ ऑगस्ट रोजी जेजुरी शहरातील नवीन पालखीतळ येथे होत असून उद्या दुपारी सुमारे दीड वाजता दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोर्हे इत्यादी सह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

मात्र या कार्यक्रमासाठी व्हीआयपी तसेच लाभार्थी यांची वाहने व एसटी बसेस यामुळे होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जेजुरी शहरातून जाणाऱ्या वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जेजुरी शहरातून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
सोमवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग तसेच ते पुणे ते बारामती मार्ग यामध्ये पर्यायी बद्दल करण्यात आले आहेत. व हे बदल पहाटे पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत लागू असतील.
यानुसार पुण्याहून बारामती कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून ती बेलसर- कोथळे- नाझरे -सुपे मोरगाव मार्गे वळवण्यात आली असून, तशीच ती पुढे बारामती- फलटण -सातारा या मार्गे वळवण्यात आली आहे.

तसेच सातारा -फलटण -लोणंद- बारामती येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक निरा -मोरगाव -सुपा -केडगाव चौफुला मार्गे पुण्याकडे वळवण्यात आले आहे.
तसेच पुण्याहून जेजुरी मार्गे फलटण सातारा कडे जाणारी वाहने सासवड नारायणपूर कापूरहोळ मार्गे वीर फाटा परिंचे- वीर -वाठार मार्ग लोणंदकडे वळवण्यात आली आहे. मात्र हे सर्व निर्बंध शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिधिल असतील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या काळात या सर्व मार्गावरून जड, अवजड व इतर सर्व वाहतूक बंद असेल.


