ब्रेकिंग न्यूज !राज्य परिक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक….
ब्रेकिंग न्यूज !राज्य परिक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक….
नमस्कार, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे . राज्य परिक्षा परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षकांना नोकरीचे आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा आरोप शैलजा दराडे यांच्यावर आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी, की सांगली जिल्ह्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकांकडून त्यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी देण्याच्या आमिष दाखवत त्यांच्याकडून १२ ते १५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणात त्यांच्या भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन 2019 आली एकूण 44 शिक्षकाकडून 12 ते 14 लाख रुपये घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बी एड शिक्षकांसाठी बारा लाख रुपये डि,एड झालेल्या शिक्षकासाठी 14 लाख रुपये शैलजा दराडे यांनी ही रक्कम त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांच्यामार्फत घेत होत्या असा त्यांच्यावर आरोप आहे. हा आकडा एकूण पाच कोटीच्या घरात गेल्याची चर्चा आहे. याप्रकरणी आपले पैसे परत मिळत नाही,, हे पाहून तक्रारदार सूर्यवंशी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. व आज हडपसर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे.