महाराष्ट्रविशेषशहर
Trending

धक्कादायक!जेजुरीजवळ दौंडज खिंडीत अपघात : एका वारकऱ्यांचा मृत्यू, तर तिघे जखमी.

धक्कादायक!जेजुरीजवळ दौंडज खिंडीत अपघात : एका वारकऱ्यांचा मृत्यू, तर तिघे जखमी.

मयूर कुदळे प्रतिनिधी:सध्या पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगळ सुरू आहे. त्यामुळे वाहनांना अंदाज न आल्याने अनेक अपघात घडत आहेत.
कार्तिकी वारीसाठी पंढरपूरहून आळंदीकडे श्री पांडुरंग व संत नामदेव महाराज पालखी सोहळा जेजुरी जवळील दौंडज खिंडीतून मार्गस्थ होताना पहाटे साडे चार वाजता या वारीतील चार वारकऱ्यांना पीकअप जीपने धडक दिली. या अपघातात एका तरुण वारकऱ्याचा मृत्यू झाला.

तर तिघे वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. पंढरपूरहून आळंदीकडे वारकरी दिंडी जात होती. पहाटे साडे चार वाजता दौंडज खिंडीत काही वारकरी टँकरच्या नळावर हात पाय धुत असताना मागून असलेल्या पीकअप जीप ने चार वारकऱ्यांना धडक दिली.
या अपघातात कृष्णा नागोराव गरुड (वय 23 रा. मटकर आळा ता. जिल्हा परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला तर
सिधेशोर प्रभाकर बोबडे (वय 23.रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी) रितेश राजाराम ब्रम्हे (वय 18 रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी) , चक्रधर कोपलवर (वय 28 रा. साडेगाव ता. जि. परभणी) हे तिघे जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे येथे दाखल केले आहे. पीकअप चालकास पोलिसांनी अटक केली असून जेजुरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर या प्रकरणी तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button