महाराष्ट्रविशेषशहर
Trending

BIG NEWS!प्रवाशांनी भरलेली रिक्षा सासवड जेजुरी महामार्गालगत असलेल्या विहिरीत पडून तीन ठार, तर दोन जणाना वाचवण्यात यश…

प्रवाशांनी भरलेली रिक्षा सासवड जेजुरी महामार्गालगत असलेल्या विहिरीत पडून तीन ठार तर दोन जण जखमी

नमस्कार पुरंदर तालुक्यातील जेजुरी सासवड महामार्ग वर खळद बोरावके मळा येथील महामार्ग लगत असलेल्या विहिरीत प्रवाशांनी भरलेली रिक्षा पडून तीन जण ठार झाले असून दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे .याबाबत सविस्तर वृत्त असे की महामार्ग लगत असलेल्या विहिरीत रात्रीच्या वेळेस रिक्षा कोसळली होती.

सदर घटनेची खबर सकाळी साडेसातच्या दरम्यान सासवड पोलिसांना समजल्यानंतर वेगाने मदत कार्य व बचाव कार्य सुरू करण्यात आले सासवड पोलीस स्टेशन अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच जेजुरी नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी ग्रामीण रुग्णालय जेजुरी तसेच सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी बचाव करत मदत केली. रेस्क्यू टीमने सकाळीच या विहिरीतून दोघांना जिवंत बाहेर काढण्यात आले. या विहिरीतून क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त रिक्षाला बाहेर काढण्यात यश आले.

मात्र अजूनही विहिरीत तीन जण असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू टीम व बचाव पथकाने अथक प्रयत्नानंतर तीन मृतांना बाहेर काढण्यात आले असून मिळालेल्या माहितीनुसार सदर दुर्घटनेमध्ये एक पुरुष व दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सदर घटनास्थळाला भोर उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी तत्काळ भेट दिली असून योग्य त्या सूचना केल्या आहेत. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती त्यामुळे बचाव कार्याला अडथळे येत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button