अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या… जेजुरी पोलिसांची कारवाई.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या… जेजुरी पोलिसांची कारवाई.
नमस्कार जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेल्या एक महिला व तिची अल्पवयीन नात यांच्याबाबत अत्यंत धक्कादायक प्रसंग घडला होता. सदर महिला व तिची अल्पवयीन नात या जेजुरी गडावर दर्शन करून (जुना गड) कडेपठार मंदिराकडे पायी निघाल्या होत्या. त्यावेळी तिथे एक अनोळखी इसमाने तुम्हाला जवळचा रस्ता दाखवतो. असे म्हणत खोल दरीतील जानाई मंदिर परिसरात नेले. व तिथे सदर मुली सोबत अत्याचार करण्याच्या प्रयत्न केला. यात सदर मुलीच्या आजीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला मारहाण करण्याचा प्रयत्न देखील केला. या झटापटीत सदर महिलेचा मोबाईल व पर्स हा इसम घेऊन पळून गेला.

सदर घटनेची फिर्याद जेजुरी पोलीस स्टेशन येथे सदर अल्पवयीन मुलीच्या आजीने दाखल केली. जेजुरी पोलीस स्टेशन येथे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने भा.द.वि. 376, 323, 506, 504 बाल लैंगिक अत्याचार प्रति कायदा 2012 चे कलम 4, 6, 8 ,10, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे, भोर सासवड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, यांच्या सूचनेप्रमाणे फिर्यादी महिला व पीडित अल्पवयीन मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील पो.हवा,वाळुंजकर यांनी सदर आरोपी बाबत रेखाचित्र तयार केली.

त्या रेखाचित्र व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, पोलीस निरीक्षक मनोज नवसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण यांच्याकडील पो.नि. अविनाश शिळीमकर, पो.स.ई शिवाजी ननवरे, तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, म. पोलीस उपनिरीक्षक रूपाली पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सीडी झेंडे, पोलीस हवालदार डीएम बनसोडे, पोलीस हवालदार वि्.बी. कदम, पोलीस कॉन्स्टेबल पी, एम. शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गव्हाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस हवालदार विजय कांचन, गुरु जाधव राजू मोमीन, पोलीस नाईक धीरज जाधव या पथकाने तपासाची चक्रे वेगात फिरवत भगवान यशवंत पडवळ वय 54 वर्ष राहणार धामारी, तालुका शिरूर जिल्हा पुणे. याला हिंगणी गाव, तालुका करमाळा ,जिल्हा सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. सदर आरोपीवर यापूर्वीचे देखील नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. सदर आरोपीस न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. रूपाली पवार करत आहेत.



