धक्कादायक ! मुलाच्या निधनाने संपूर्ण कुटुंब दुःखात…. डीजे बंद करा… सांगितल्याच्या रागातून जमावाची संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण….
डीजे बंद करायला सांगितला….. आणि जमावाने केली बेदम मारहाण…
नमस्कार संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी डीजे बंद करायला लावला या रागातून संपूर्ण कुटुंबालाच बेदम मारहाण केल्याची घटना पुणे जिल्ह्यातून समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25 सप्टेंबर रोजी मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे राहणारे सुनील प्रभाकर शिंदे यांच्या मुलाचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते त्यामुळे संपूर्ण कुटुंबच दुःखाच्या छायेत होते .मात्र गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे सुरू होता तो डीजे घरासमोर आल्यानंतर कुटुंबीयांनी कृपया आमच्या घरासमोर डीजे लावू नका. माझ्या मुलाचे निधन झाले असे सांगितल्यानंतर त्यावेळेस तो डीजे बंद करण्यात आला.
मात्र गणपतीचे विसर्जन करून परत येत असताना डीजे बंद करायला लावला याचा राग मनात ठेवून सुमारे 21 जणांनी या संपूर्ण कुटुंबालाच बेदम मारहाण केल्याची फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी सुमारे 21 जणांना अटक केली असून१) सुनील बंदा रजपूत२) मुकेश करसन रजपूत ३)रवी करसन रजपूत४) सनी करसन रजपूत ५)अक्षय ज्ञानेश्वर काकडे ६) अतुल वेलसी रजपूत ७) कृष्णा बलभीम खराते ८) रवी हिरा रजपूत९) संदीप रमेश रजपूत १०) विशाल काळुराम रजपूत११) संतोष काळूराम रजपूत १२) विलास हिरा रजपूत १३)अनिल हिम्मत रजपूत १४) करसन जयंती रजपूत १५)दीपक हिम्मत रजपूत १६)आकाश अशोक रजपूत १७)काळूराम भिका रजपूत १८) वसंत भिका रजपूत १९)अमित वेलसी रजपूत २०) प्रवीण करसन रजपूत आणि रमेश जयंती रजपूत अशी अटक केलेली यांची नावे आहेत.