महाराष्ट्रविशेषशहर
Trending

जेजुरी एसटी बस स्थानक येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह…

जेजुरी एसटी बस स्थानक येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह…

नमस्कार जेजुरी एसटी बस स्थानक परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान 50 ते 55 वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

सदर व्यक्तीचा वर्ण सावळा असून, उंची पाच फूट चार इंच, अंगात मेहंदी रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट घातलेली आहे .दाढी वाढलेली असून डाव्या पायाच्या पंजाला जुनी जखम असल्याचे दिसून येत आहे. सदर मयता बाबत कोणतीही ओळख पटत नाही. या मयता बाबत जेजुरी एसटी बस स्थानकाचे व्यवस्थापक दगडू धर्माजी बुनगे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे.

सदर मयताचा पुढील तपास पोलीस नाईक नांदे हे करीत आहेत. तरी याबाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आव्हान जेजुरी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.संपर्क ०२११५-२५३१२९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button